Parents Testimonials for Sports Day 26 th – 27 th November 2025| Schools in GB Road Thane

Parents Testimonials for Sports Day 26 th – 27 th November 2025 - Visit us for more info on gb.svptsaraswati.com

Behind Muchala College, Near Swastik Residency, Ghodbunder Road, Thane (West), Mumbai, Maharashtra - 400615
India.
Tel : (91-22) 2597 2814
Email : saraswatividyalaya@gmail.com

gb.svptsaraswati.com

  • saraswatividyalaya@gmail.com
  • + 91 9930233874

SCHOOL EVENTS

Parents Testimonial for Annual Function

आदरणीय
प्राचार्य मॅडम नमस्कार,

मी अॅड. डॉ. दीपक कोल्हे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथून आपल्या शाळेबद्दल मी प्रतिक्रिया देत आहे.

आपल्या सरस्वती विद्यालय ठाणे या शाळेची जुनिअर स्कूल कॅप्टन अद्विका तटाणे हिचा मी काका आहे. आपल्या शाळेतील सतत होणारे कार्यक्रम मी अद्विका तटाणे हिच्या माध्यमातून यु ट्यूब वरती पहात असतो.

आपल्या शाळेत या वर्षी दिनांक २०.१२.२५ रोजी घेण्यात आलेला अनिवल डे चा कार्यक्रम माझ्या मनाला खूपच भावला आहे. आपल्या शाळेत नेहमीच भारतीय संस्कृती व महाराष्ट्रीयन संस्कृती जतन करणारे कार्यक्रम घेतले जातात हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.

बालमनावरती भारतीय संस्कृतीचे संस्कार करण्याचं महान आणि पवित्र कार्य आपल्या शाळेतून होते याचा खूप आनंद वाटतो. विज्ञानाने माणसाला अंतराळात जाता येते परंतु माणसाच्या अंतरंगात जाण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. या संवेदनशील मनाची जडणघडण बाल्य अवस्थेतच करण्यासाठी आपण आपल्या शाळेतून उत्कृष्ट असे सूंदर कार्यक्रम घेतात. याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. मी अनेक ठिकाणी शाळेच्या गॅदरिंग साठी प्रमुख पाहुणा म्हणून नेहमी जात असतो, परंतु आपल्या शाळेमध्ये एखादी संस्कृतीची थीम घेऊन साधारणपणे दीड ते दोन तास विद्यार्थी एका थीम वरती सुंदर अभिनय करून त्यातून समाजाला योग्य संदेश देतात हे माझ्यातरी पहिल्यांदाच पाहण्यात येत आहे.

यावर्षी आपण घेतलेल्या राधा कृष्णाच्या थीम मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या अनेक लीला विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत. हे संवाद लिहीत असताना शिक्षकांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. संवाद हे मनाला स्पर्श करून जातात. प्रत्येक विद्यार्थ्याने केलेला सुंदर अभिनय आणि त्यासाठी प्राचार्य, शिक्षक व इतर स्टाफ यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभिनय चालू असताना त्या पाठीमागे स्क्रीन वरती दाखवण्यात येत असलेले चित्र, आवाज हे उत्तम होते. विद्यार्थ्यांच्या पात्रांची वेशभूषा अतिशय सुंदर पद्धतीने केलेली होती.

मी लहानपणापासून पाहतो, ती खुप मेहनती, नम्र, अभ्यासू, खेळाडू व कलासक्त मनाची आहे. तिच्यातील गुण ओळखून तिला आपण योग्य संधी दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या शाळेमुळे तिच्या व्यक्तिमत्वातील होणारी प्रगती आम्हाला दिसून येते. सर्वच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली शाळा वचनबद्ध कटिबद्ध आहे याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो.

तसेच दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी अनायरा तटाणे, सिनियर घॠ, हिच्या माध्यमातून युट्युब वरती जंगल थीम हा कार्यक्रम पाहण्यात आला तो कार्यक्रमही खूप सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केला. जंगलातील प्राणी आणि पर्यावरण याचं महत्त्व बालमनावर बिंबवण्याचं महत्त्वाचं कार्य या मधून पाहायला मिळाले.

व अजून एक अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे स्पोर्ट डे च्या दिवशी अद्विका व तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनी सादर केलेली तलवारबाजी, लाठी काठी, लेझीम, अंगावरती शहारे आणणारी छत्रपती शिवरायां बद्दल देण्यात आलेली घोषणा हे सर्वच खूपच प्रेरणादायी होते. खेळ माणसाला नैराश्यातून बाहेर काढतात. सुदृढ शरीरात सुदृढ मन नांदत असतं. मुलींनी मैदानी खेळात पुढे राहून तलवार बाजी, लाठी काठी फिरवणे एक आदर्शवत आहे. ते आपल्या शाळेत पाहायला मिळाले.

प्रत्येक कार्यक्रमातआपल्या संस्थेचे पदाधिकारी व उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शनही प्रेरणादायी असते. त्यांचेही खूप खूप अभिनंदन करतो.

आपल्या भारतीय संस्कृतीच्या विचारांनी मनुष्याच्या जीवन वाटा उजळून निघतात. विवेकदीप प्रज्वलित करतात.आपल्याला लोकांनी चांगला माणूस म्हणावं म्हणून स्वीकारलेलं सज्जनत्व अनेक प्रसंगी गळून पडते आणि माणसाचे खरे रूप समोर येते, पण कोणत्याही फळाची, लाभाची अपेक्षा न करता जेव्हा आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे सत्कर्म केले जाते तेव्हाच जीवनाला चंदनाचा गंध, परिसाचा गुणधर्म, दिव्यत्वाचा प्रकाश आणि साखरेचा गोडवा प्राप्त होतो. आणि असा देशाचा जबाबदार नागरिक निर्माण करण्याचं कार्य आपल्या शाळेतून होतं याचा आनंद वाटतो. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहान मुलांच्या मनावरती योग्य संस्कार करून आपल्या शाळेतून संस्कारक्षम, गुणवान विद्यार्थी घडतात याचं सर्व श्रेय आपल्या शाळेतील प्राचार्य, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी आणि जागृक पालक यांना जाते.

आपल्या शाळेतून खूप मोठे कलावंत, प्रशासनातील खूप मोठे अधिकारी, न्यायाधीश, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस, राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करणारे पुढारी निर्माण होऊन त्यांनी समाजाची आणि राष्ट्राची सेवा करावी याच शुभेच्छा देतो....

आपलाच अॅड. डॉ. दीपक कोल्हे
(B.-., LL. M.,Ph.D. in -nti-corruption Law) अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जिल्हा व सत्र न्यायालय जालना. ९४०४०४४०२.